Shukra Gochar 2025 : सप्टेंबरमध्ये 'या' 3 राशींचं नशीब रातोरात पालटणार; शुक्राच्या संक्रमणाने आयुष्य झटक्यात बदलणार, आर्थिक संपत्तीत भरभराट

Shukra Gochar 2025 : सप्टेंबरमध्ये 'या' 3 राशींचं नशीब रातोरात पालटणार; शुक्राच्या संक्रमणाने आयुष्य झटक्यात बदलणार, आर्थिक संपत्तीत भरभराट
By : | Updated at : 10 Sep 2025 12:13 PM (IST)

Shukra Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, धनवैभव, संपत्तीचा दाता शुक्र ग्रहाला सर्वात शक्तिशाली ग्रह मानतात. शुक्र ग्रह जवळपास 26 दिवसांनी राशी परिवर्तन करतात. त्यामुळे एका राशीत पुन्हा येण्यासाठी जवळपास एक वर्षांचा कालावधी लागतो. शुक्र ग्रहाच्या स्थितीतील बदलाचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो.

ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र ग्रह सध्या मिथुन राशीत विराजमान आहे. त्यानंतर शुक्र कर्क राशीत प्रवेश करणार आहे. सप्टेंबर महिन्यात सूर्याच्या राशीत म्हणजेच सिंह राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र ग्रहामुळे तीन राशींना चांगला लाभ मिळू शकतो. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र ग्रह 15 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजून 23 मिनिटांनी सिंह राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत 9 ऑक्टोबरपर्यंत स्थित असणार आहेत.

मिथुन रास (Gemini Horoscope)

या राशीच्या कुंडलीतील पाचव्या आणि बाराव्या चरणाचा स्वामी शुक्र ग्रह तिसऱ्या चरणात संक्रमण करणार आहे. या राशीच्या लोकांसाठी हा काळ फार अनुकूल असणार आहे. तुम्हाला भौतिक सुख-सुविधांचा चांगला लाभ घेता येईल. तसेच, तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांचं कामात प्रमोशन होण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल.

तूळ रास (Libra Horoscope)

शुक्र ग्रह या राशीच्या पहिल्या आणि आठव्या चरणाचे स्वामी ग्रह आहे. सिंह राशीत संक्रमण करुन शुक्र अकराव्या चरणात प्रवेश करणार आहे. या काळात तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढलेली दिसेल. तसेच, नवीन गोष्टीतून तुम्हाला आनंद मिळेल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार अधिक वाढेल. तसेच, करिअरमध्ये देखील तुम्ही प्रगतीच्या उंच शिखरावर असाल. प्रतिस्पर्ध्यांना चांगली टक्कर द्याल. या काळात धनलाभ होण्याची देखील शक्यता आहे.

कुंभ रास (Aquarius Horoscope)

शुक्राच्या संक्रमणामुळे कुंभ राशीच्या लोकांना देखील चांगला लाभ मिळणार आहे. या काळात तुमच्या करिअरमध्ये येणार चढ-उतार संपतील. तसेच, नवीन मित्रांशी भेटीगाठी होतील. नवीन गोष्टी तुम्ही शिकाल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा देखील चांगला पाठिंबा पाहायला मिळेल. बिझनेसच्या नवीन डील तुमच्या हातात येऊ शकतात. एकूणच तुमची आर्थिक स्थिती फार चांगली असेल.

📚 Related News