Anil Parab on Devendra Fadnavis: फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना 'महाराष्ट्राचा पप्पू' म्हणताच अनिल परबांचा जोरदार पलटवार; म्हणाले, भाजप आमच्यावर टीका करतंय म्हणजे...

Anil Parab on Devendra Fadnavis: फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना 'महाराष्ट्राचा पप्पू' म्हणताच अनिल परबांचा जोरदार पलटवार; म्हणाले, भाजप आमच्यावर टीका करतंय म्हणजे...
By : | Updated at : 28 Oct 2025 03:55 PM (IST)

Anil Parab on Devendra Fadnavis:शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी सोमवारी सायंकाळी मतचोरीवरून राज्य सरकार (Maharashtra government) आणि निवडणूक आयोगावर (Election Commission) हल्लाबोल केला होता. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याप्रमाणेच आदित्य ठाकरे यांनी प्रेझेंटेशन करत मतचोरी होत असल्याचा आरोप केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्राचा पप्पू बनू नये, असा टोला आदित्य ठाकरेंना लगावला. आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. Anil Parab on Devendra Fadnavis:भाजप आमच्यावर टीका करतंय म्हणजे काहीतरी घोळ अनिल परब म्हणाले की, आम्ही प्रश्न विचारतोय निवडणूक आयोगाला उत्तर देतेय कोण? निवडणूक आयोगाचे मालक म्हणजे भाजप.

आदित्य साहेबांनी काल चुकीची मत आहेत ती दाखवली. यात कसला आलाय पप्पूपणा? याचं उत्तर निवडून आयोगाने दिल पाहिजे. घरगडी असल्यासारखं काम हे भाजप करत आहे. भाजप आमच्यावर टीका करतंय म्हणजे काहीतरी घोळ झालेला आहे. निवडणूक आयोगाला आम्ही प्रश्न विचारले तर त्यांनी उत्तर दिल पाहिजे.

आम्ही प्रश्न विचारला एकाला, मुख्यमंत्र्यांना आम्ही प्रश्न विचारला नाही. ते कशाला उत्तर देतायत? 1 तारखेचा मोर्चा आहे. त्यावर आवाज उठवला आहे, आम्हीच नाही तर सामान्य जनता रस्त्यावर आंदोलनाला उतरेल, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. Devendra Fadnavis on Aaditya Thackeray: काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्रचा पप्पू आहे, असे प्रदर्शन करू नये. मी त्यांना ाचा पप्पू म्हणणार नाही.

राहुल गांधी जशी मोठी स्क्रीन लावतात आणि इकडून तिकडून फिरतात. पण खोदा पहाड, चुहा भी नही निकला, असे असते. आदित्य ठाकरेंनी हेच केले. त्यांची उत्तरं निवडणूक आयोगाने दिलेली आहेत. आदित्य ठाकरेंकडून माझी एवढीच अपेक्षा आहे की, त्यांनी राहुल गांधी बनू नये, असा टोला त्यांनी आदित्य ठाकरेंना लगावला.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ इतर महत्त्वाच्या बातम्या.

📚 Related News