Quick Summary
This article highlights: मुस्लिम कुटुंबाची सून झाली, बॉलीवूड सोडलं..नाकारली कोट्यावधींची कामसूत्र जाहिरात, मुलाखतीत सगळंच सांगितलं. In context: Bollywood: बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदी (Pooja Bedi) तिचा माजी पती फरहान फर्निचरवाला (Farhan Farnichurwala) यांचा घटस्फोट होऊन तब्बल दोन दशकं उलटली लग्नानंतर या अभिनेत्रीने चित्रपट सृष्टीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. Stay tuned with The Headline World for more insights and details.
Bollywood: बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदी (Pooja Bedi) तिचा माजी पती फरहान फर्निचरवाला (Farhan Farnichurwala) यांचा घटस्फोट होऊन तब्बल दोन दशकं उलटली. लग्नानंतर या अभिनेत्रीने चित्रपट सृष्टीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या आयुष्यातील हा मोठा निर्णय कशामुळे घेतला? काय कारण होती ? हे उघडपणे सांगितला आहे. लग्नानंतर तिने अचानक चित्रपटसृष्टीपासून दूर राहण्याचा निर्णय का घेतला, याबद्दल ती मोकळेपणाने बोलली.
“कटुतेच्या आधी आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला”
पूजा म्हणाली, “आमचं नातं जमत नाही हे आम्हाला खूप लवकर कळलं, आणि नातं कटुतेच्या टप्प्यावर पोहोचण्यापूर्वीच आम्ही वेगळे झालो. आमच्या मुलगी आलाया पाच वर्षांची असताना आम्ही घटस्फोट घेतला. मी त्यांना सिंगल आई म्हणून वाढवलं, पण फरहान नेहमीच एक प्रेमळ आणि जबाबदार वडील राहिला. वीकेंडला मुलं त्याच्याकडे जायची आणि त्याच्यासोबत वेळ घालवायची, पण दैनंदिन जबाबदारी माझ्यावर होती.”
“सासरच्या कुटुंबाचा मान राखण्यासाठी अभिनय सोडला”
पूजा बेदी म्हणाली, “मी उद्योगपती फरहान फर्निचरवालाशी लग्न केलं. तो एका रुढीवादी मुस्लीम कुटुंबातून होता. अशा घरात सेटवर जाणारी सून स्वीकारली जाणं शक्यच नव्हतं. त्यामुळे सर्वांचा आदर राखण्यासाठी आणि मला सगळ्यांनी आपलंसं मानावं म्हणून मी अभिनयातून मागे हटले.”
अफवा आणि गॉसिपने अभिनेत्रींचं आयुष्य कठीण बनवलं
90 चं दशक म्हणजे बॉलिवूडमधील अफवांचा काळ. त्या काळाची आठवण करत पूजा म्हणाली, “तेव्हा एखादा चित्रपट रिलीज झाला की हिरो-हिरोइनच्या अफेअरच्या चर्चा पसरायच्या. ज्यामुळे घरच्यांना अभिनेत्री सून म्हणून स्वीकारणं कठीण जायचं. ‘सेक्सी बहू’ किंवा ‘सेक्स सिम्बॉल बहू’ असं लेबल लागलं तर समाज ते सहन करायचा नाही.”
दोनच पर्याय होते लग्न करू नका किंवा करिअर सोडा..
पूजा पुढे म्हणाली, “मी माझ्या करिअरचा नीट विचार केला. जर काही करायचं असेल तर ते पूर्ण आदराने करायचं, हा माझा नियम होता. त्यामुळे माझ्यासमोर दोनच मार्ग होते. लग्न करू नये किंवा लग्नानंतर इंडस्ट्रीला रामराम करावा. मी दुसरा पर्याय निवडला. मी त्या वेळी घेतलेल्या सगळ्या चित्रपटांच्या साइनिंग रक्कमा परत केल्या. कामसूत्र जाहिरातीचं नूतनीकरण येणार होतं, पण तेही मी नाकारलं, त्यांनी मला पहिल्यांदा मिळालेल्यापेक्षा आठपट जास्त पैसे ऑफर केले गेले होते,” असं पूजाने सांगितलं.
Content compiled and formatted by The Headline World editorial team.







