आदित्यने पप्पू असल्याचं प्रदर्शन करू नये, मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर बोचरी टीका, रोहित पवारांनाही इशारा

आदित्यने पप्पू असल्याचं प्रदर्शन करू नये, मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर बोचरी टीका, रोहित पवारांनाही इशारा
By : | Updated at : 28 Oct 2025 03:51 PM (IST)

: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांकडून मतचोरीचा आरोप केला जात असून बोगस मतदार यादीत असल्याचे पुरावे दाखवण्यात येत आहेत. आधी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेतच बोगस आधार कार्ड काढून दाखवलं होतं. त्यानंतर, आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील वरळी मतदारसंघात बोगस मतदार असल्याचे शिवसेना निर्धार मेळाव्यात व्हिडीओ, पिपीटीद्वारे दाखवून दिले. आता, भाजपा नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार आदित्य ठाकरे आणि आमदार रोहित पवार यांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपावरून पलटवार केला आहे.

काही जणांकडून खोटे कागदपत्र दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. खोटं आधार कार्ड काढलं कोणी याची चौकशी आता होईल. महाराष्ट्राला खोटं डाॅक्युमेंट दाखवलं, आता त्यासंदर्भात माफी मागणार आहात का? असा सवाल मुख्यमंत्री फडणवीस यांनी रोहित पवार यांना विचारला. आमच्याकडे तक्रार आली तर आम्ही चौकशी करु. मात्र, तक्रारच आली नाही तर कशी होईल.

रोहित पवार यांनी दाखवलेले आधार कार्ड आजच खोटं निघालं आहे, आता ते माफी मागणार आहेत का?खोटे डाॅक्युमेंट घरीच तयार करायचे, आता त्यासंदर्भात एफआयआर दाखल होतोय, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. आदित्य ठाकरेंनी पप्पू असं प्रदर्शन करू नये मतचोरी संदर्भात आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपावरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी पलटवार केला. माझी अपेक्षा होती की आदित्य ठाकरेंनी ाला पप्पू आहे, असं प्रदर्शन करु नये. मी त्यांना पप्पू म्हणत नाही, ना ते आहेत असं मला वाटतं. मात्र, ज्या प्रकारे राहुल गांधींनी केलं.

खोदा पहाड आणि चुहा भी नहीं निकला असं बोलायचं. तेच काल आदित्य ठाकरेंनी केलंय, अशी बोचरी टीका ांनी आदित्य ठाकरेंवर केली. तसेच, माझी अपेक्षा ऐवढीच आहे, आयोगाने उत्तरं दिली आहेत, ही लोकं पुरावा देऊ शकले नाही. माझी अपेक्षा आहे की राहुल गांधी बनू नका, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला. दरम्यान, विरोधकांचा 1 नोव्हेंबर रोजीचा मोर्चा म्हणजे कव्हर फायरींग आहे.

निवडणुका आहेत, त्यामुळे कव्हर फायरींग करत आहेत. निवडणुका जिंकू शकत नाहीत, त्यामुळे ही लोकं हे करत आहेत, असेही फडणवीसांनी म्हटले. हेही वाचा.

📚 Related News