करिश्मा कपूरच्या मुलांचे सावत्र आईवर सनासनाटी आरोप, 30 हजार कोटींच्या संपत्तीचा वाद हायकोर्टात पोहोचला

करिश्मा कपूरच्या मुलांचे सावत्र आईवर सनासनाटी आरोप, 30 हजार कोटींच्या संपत्तीचा वाद हायकोर्टात पोहोचला
By : | Updated at : 09 Sep 2025 05:36 PM (IST)

Karisma Kapoor : बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा घटस्फोटीत पती संजय कपूर यांच्या 30 हजार कोटींच्या संपत्तीवरुन मोठ्या वादाला सुरुवात झाली आहे. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर 30 हजार कोटींच्या मालमत्तेबाबत आधीपासूनच त्यांच्या आई आणि पत्नीमध्ये वाद सुरू होता. आता करिश्मा आणि संजयची मुलंही सावत्र आई प्रिया कपूरवर फसवणुकीचे आरोप करत आहेत. करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांची मुलं समायरा कपूर आणि किआन कपूर यांनी वडिलांच्या मालमत्तेसंदर्भात न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. समायरा आणि किआन यांनी दिल्ली हायकोर्टात अर्ज दाखल केला असून, 21 मार्च 2025 रोजीची इच्छापत्र संशयास्पद, बनावट आणि खोटं असल्याचा दावा केला आहे.

वडिलांच्या संपत्तीत 20-20 टक्के हिस्सा मिळावा, करिश्मा कपूरच्या मुलांची मागणी

करिश्मा कपूरच्या मुलांनी आपल्या याचिकेत प्रिया कपूरवर आरोप केला आहेत. त्यांनी सात आठवडे संजय कपूर यांचं इच्छापत्र लपवून ठेवलं. दिल्ली हायकोर्टात दाखल अर्जात समायरा आणि किआन यांनी वडिलांच्या संपत्तीत 20-20 टक्के हिस्सा मिळावा, अशी मागणी केली आहे. तसेच वाद सुटेपर्यंत सर्व मालमत्ता गोठवून ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे.

12 जूनला झाला होता संजय कपूर यांचा मृत्यू

संजय कपूर यांचे 12जून 2025 रोजी यूकेमध्ये अचानक निधन झाले होते. काही रिपोर्ट्नुसार पोलो खेळताना त्यांनी चुकून मधमाशी गिळली होती. त्यानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर एक आठवड्यानंतर दिल्लीमध्ये त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. यावेळी करिश्मा कपूर आपल्या मुलांसह उपस्थित होती. संजय कपूर यांच्या ३० हजार कोटींच्या संपत्तीवरुन त्यांच्या आई, बहिणी आणि पत्नी प्रिया सचदेव यांच्यातही वाद सुरु आहे. मंदिरा यांनी एएनआयशी बोलताना प्रिया यांच्यावर आरोप केला होता की त्यांनी बंद दाराआड त्यांच्या आईकडून काही कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या करून घेतल्या.

सन 2003 मध्ये संजय कपूर यांनी बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरशी विवाह केला होता. या विवाहातून त्यांना दोन मुले झाली – मुलगी समायरा आणि मुलगा कियान. मात्र, काही वर्षे एकत्र राहिल्यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. सन 2014 मध्ये करिश्माने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आणि 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. या काळात करिश्माने संजयवर अनेक गंभीर आरोपही केले होते. नातं कटुतेने संपले असले तरी संजय आपल्या मुलांशी भेटत-गाठी करत राहिले.

इतर महत्त्वाच्या बातम्या

📚 Related News