Megha Dhade Supports Mahesh Kothare: '...तर उद्धव सेनेला इंगळ्या डसल्या'; सुप्रसिद्ध अभिनेत्रीनं जाहीरपणे घेतली महेश कोठारेंची बाजू, उर्मिला मातोंडकर, महेश मांजरेकरांचाही केला उल्लेख

Megha Dhade Supports Mahesh Kothare: '...तर उद्धव सेनेला इंगळ्या डसल्या'; सुप्रसिद्ध अभिनेत्रीनं जाहीरपणे घेतली महेश कोठारेंची बाजू, उर्मिला मातोंडकर, महेश मांजरेकरांचाही केला उल्लेख
By : | Updated at : 23 Oct 2025 01:10 PM (IST)

Megha Dhade Supports Mahesh Kothare:गेल्या काही दिवसांपासून मराठी अभिनेते (Marathi Actor), निर्माते महेश कोठारे (Mahesh Kothare) भलतेच चर्चेत आहेत. त्यांच्या एका कृतीमुळे अनेकजण त्यांना पाठींबा देत आहेत. तर, अनेकांनी टीकेची झोड उठवली आहे. यासाठी निमित्त ठरलं, काही दिवसांपूर्वी महेश कोठारेंनी (Mahesh Kothare Supports BJP) भाजपला (BJP) दिलेला जाहीर पाठींबा. दिवाळीनिमित्त भारतीय जनता पार्टीनं एक कार्यक्रम आयोजित केलेला, त्या महेश कोठारे सहभागी झाले होते.

त्यावेळी त्यांनी मी मोदी भक्त असून, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचंच कमळ फुलणार असल्याचं वक्तव्य केलेलं. त्यानंतर अनेकांनी महेश कोठारेंवर टीका केली. अगदी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, शिवसेना ठाकरे गटाच्या मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही महेश कोठारेंवर टीकेची तोफ डागली. पण, अशातच आता मराठी अभिनेत्री मेघा धाडेनं (Marathi Actress Megha Dhade) महेश कोठारेंची बाजू घेतली आहे. यासंदर्भात तिनं सोशल मीडियावर एक पोस्टही केली आहे.

मेघा धाडे सोशल मीडियावर पोस्ट करुन काय म्हणाली? मेघा धाडे सोशल मीडियावर पोस्ट करुन म्हणाली की, "अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनं उद्धव सेना जॉइन केली होती, तेव्हा कोणत्याही भाजप प्रवक्त्यानं तिच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर आक्षेप घेतला नव्हता! सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकरनं तर मनसेच्या तिकिटावर लोकसभा लढवली होती, तरी कोणी आक्षेप घेतला नाही! परंतु महेश कोठारेंनी मोदींची तारीफ केली की, उद्धव सेनेला इंगळ्या डसल्या! कोठारेंवर टीकेची झोड उठवली गेली! त्यांच्या मराठीपणावर देखील शंका घेण्यात आली!" "हे असे झाले कारण कोठारे जे बोलले ते मनापासून बोलले कोणत्या तिकीटाच्या लालसेपोटी, कोणाचे पाकीट मिळवण्यासाठी ते असे बोलले नाही एक सामान्य मुंबईकरांची जी भावना आहे जो मुंबईकर आधी रस्त्यावर धक्के खायचा तो आता मेट्रोत गार वाऱ्यात वेगाने प्रवास. करतोय जो मुंबईकर आधी ट्रॅफिक मध्ये अडकायचा आता तो अटल सेतूवरून सुसाट धावतोय त्या करांच्या भावनांचे प्रगटीकरण कोठारेंच्या भाषणात झाले आणि म्हणूनच उद्धव सेनेच्या पायाखालची जमीन सरकली! आणि हे सत्यात देखील उतरणार आहे. ", असं मेघा धाडे म्हणाली आहे. यासोबत मेघा धाडेनं एक कॅप्शनही लिहिलंय. ती म्हणाली की, "महेश सर तुम्ही जे बोललात ते तुमचं मत होतं , जे तुम्ही मनापासून व्यक्त केलं , आम्हा सगळ्यांना तुमच्या मताचा शंभर टक्के आदर आहे.

बाकी टीका करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा कारण कुछ तो लोग कहेंगे लोगो का काम है कहना छोडो बेकार की बातो को, हमे तो सच के साथ ही हैना. " तसेच, मेघा धाडेनं या पोस्टमध्ये महेश कोठारेंना टॅगही केलं आहे. महत्त्वाच्या इतर बातम्या :.

📚 Related News