Bacchu Kadu Farmer Protest :शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाला घेऊन बच्चू कडूंच्या नेतृत्वात राज्यभरातील शेतकरी आणि प्रहार कार्यकर्त्यांनी नागपुरात चक्काजाम आंदोलन (Bacchu Kadu Farmer Protest) सुरू केलं आहे. दरम्यान या आंदोलनकर्त्यांनी हैदराबाद महामार्ग आणि तिथून समृद्धीकडे जाणारा महामार्ग बंद पाडला आहे. अशातच भंडाऱ्याचे प्रहारचे जिल्हाप्रमुख अंकुश वंजारी यांच्यासह अन्य जिल्ह्यातील शेतकरी (Farmer Protest) आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांनी हा महामार्ग बंद केला असता या आंदोलनात जिल्ह्याच्या देवरी मतदार संघाचे भाजप आमदार राजू बकाने (Raju Bakane) हे त्यांच्या वाहनात अडकले होते. मात्र, त्यानंतर आमदार बकाने हे त्यांच्या वाहनाला तिथेच सोडून सुरक्षारक्षकाच्या घेऱ्यात आंदोलनकर्त्यांपासून नजर चुकवून लपत जाण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी काही आंदोलकांच्या निदर्शनात आमदार बकाने पडले आणि त्यांनी आमदार बकाने यांना तिथेच अडवून धरलं.
त्यानंतर प्रहारच्या या आंदोलनकर्त्यांनी भाजप आमदार बकाने यांना बच्चू कडू सोबत आंदोलनस्थळी नेत बसविले. दरम्यान, चार तासांपासून भाजप आमदार बकाने हे बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गराड्यात आंदोलनस्थळी होते. यावेळी आमदार बकाने यांनी, आंदोलनकर्त्यांना शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे आणि येत्या अधिवेशनात हा मुद्दा मी लावून धरेल असे आश्वासन दिलं आहे. Nagpur Farmer Agitation:12 वाजेपर्यंतचे अल्टिमेटम, त्यानंतर रेल्वे रोकोचा इशारा नागपूरमध्ये (Nagpur) बच्चू कडू (Bacchu Kadu), राजू शेट्टी (Raju Shetti) आणि महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी (Farm Loan Waiver) भव्य मोर्चा काढलाय. अद्याप बच्चू कडू यांचे आंदोलन सुरूच असून अजूनही प्रहारच्या कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखून धरला आहे.
कालची (28) रात्र बच्चू कडू आणि आंदोलकांनी जामठा येथे महामार्गावर काढली आहे. कालच्या तुलनेत गर्दी कमी झाली असली तरी शेकडो ट्रॅक्टर आणि वाहनांसह आंदोलन महामार्ग रोखून बसले आहे. आज 12 वाजेपर्यंतचे अल्टिमेटम बच्चू कडू यांनी दिले आहे. त्यानंतर रेल्वे रोकोचा इशारा दिला आहे. त्यामुळे बच्चू कडू यांच्या आंदोलनासंदर्भात सरकार नेमकं काय पाऊल उचलतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Ravikant Tupkar :किती शेतकऱ्यांनी जीवन संपवल्यावर सरकारची योग्य वेळ येणार? च्या वेशीवर हजारो शेतकऱ्यांनी एकत्र येत चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि बच्चू कडू करत आहेत. 'जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही,' अशी स्पष्ट भूमिका रविकांत तुपकर यांनी मांडली आहे. समृद्धी महामार्गासह जबलपूर, आणि हैदराबादकडे जाणारे प्रमुख मार्ग शेतकऱ्यांनी रोखून धरले आहेत. शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमुक्ती आणि सोयाबीन-कापसाला योग्य भाव मिळावा या प्रमुख मागण्या आहेत.
सरकारने बैठकीचे निमंत्रण देऊनही शेतकरी नेते उपस्थित राहिले नाहीत, असा दावा सरकारतर्फे केला जात आहे, तर दुसरीकडे ऐनवेळी निमंत्रण आल्याने पोहोचणे शक्य नव्हते, असे रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे. हे जाती-धर्माचे नाही, तर मातीचे आंदोलन असल्याने सरकारने स्वतः चर्चेसाठी पुढे यावे, अशी मागणीही त्यांनी केली. ही बातमी वाचा:.







