मुंबई : राजधानी राज्यातील परिवहन सेवा गतीमान करण्यासाठी, अत्याधुनिक करण्यासाठी राज्य सरकारने एसटीच्या ताफ्यात 5000 नव्या बसेस आणण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार, टप्प्याटप्प्याने या बस प्रवाशांच्या सेवेत येत आहेत. मुंबईच्या बेस्ट उपक्रमातील 150 नवीन इलेक्ट्रिक लोकार्पण सोहळा आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. आपण 157 इलेक्ट्रिकल बसचं लोकार्पण आज करत आहोत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मुंबईतील 21 मार्गावर या बस धावणार असून 1.
9 लाख मुंबईकर प्रवाशांना याचा लाभ घेता येईल. आपल्या मुंबईकरांना अधिक सोयीच्या गाड्या दिल्या पाहिजे आणि प्रदूषण कमी केलं पाहिजे. 5000 बस घेण्याचा निर्णय झाला. , टप्पा टप्प्याने या येत आहेत. त्यातील 157 बस आज येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री यांनी दिली.
बेस्टची सेवा एकप्रकारे जीवनवाहिनी आहे. कर्मचारी समाधानी असतील तर सेवा उत्कृष्ट होईल असे मानणारे आम्ही आहोत. सिंगल तिकीट वर आपण गेले आहोत, बेस्टला आपल्या पायावर उभ राहण्यासाठी नॉन फेअर बॉक्सची मदत होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले. बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमा (BEST) मार्फत एकूण 150 नवीन 12 मीटर लांबीच्या संपूर्णपणे इलेक्ट्रिक बसगाड्या प्रवर्तित करण्यास सज्ज झाल्या आहेत. या बसगाड्या 'वेट लीज' पद्धतीने चालविल्या जाणार असून, त्यामुळे मुंबईतील पर्यावरणपूरक आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार आहे.
यापैकी 115 बसगाड्यां PMI इलेक्ट्रो मोबिलिटी या उत्पादक कंपनीच्या असून त्या मुंबादेवी मोबिलिटी प्रा. लि. या कंत्राटदार ऑपरेटरमार्फत चालविल्या जातील. तर, 35 बसगाड्या ओलेक्ट्रा ग्रीनटेक लि. या उत्पादक कंपनीच्या असून त्या ईव्ही ट्रान्स महाराष्ट्र प्रा.
लि. या ऑपरेटरमार्फत चालविल्या जातील. तपशील खालीलप्रमाणेः कंत्राटदार डेपो आणि बसगाड्यांची संख्या मुंबादेवी मोबिलिटी प्रा. लि. (PMI)ओशिवरा 82आणिक 33ईव्ही ट्रान्स प्रा.
लि. (Olectra)कुर्ला 11गोराई 24एकूण 150 या बसगाड्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग प्रवाशांसाठी रॅम्पची सुविधा देण्यात आलेली आहे. सदर 150 इलेक्ट्रिक बसगाड्या मुंबईतील 21 मार्गावर चालविण्यात येणार आहेत, ज्यामध्ये 21 प्रभागांचा समावेश आहे. बसगाड्यांची गुणवत्ता नियंत्रण केंद्राद्वारे नियमित देखरेख केली जाईल. ही बससेवा अंधेरी (प.
), जोगेश्वरी (प. ), कुर्ला (पूर्व व पश्चिम), बांद्रा (प. ), कांदिवली (प. ) आणि बोरिवली (प. ) या उपनगरी रेल्वे स्थानकांशी जोडली जाणार आहे.
या बसगाड्या मेट्रो लाईन क्र. 1,2A, 7 आणि 3 (अॅक्वा लाईन) या प्रमुख मेट्रो मार्गाशी जोडणी साधून मेट्रो प्रवाशांना अखंड शेवटच्या टप्प्यापर्यंतची (Last-Mile) जोडणी उपलब्ध करून देतील. त्यामुळे सुमारे 1. 9 लाख मुंबईकर प्रवाशांना दररोज दर्जेदार प्रवास अनुभवता येईल. 150 नवीन इलेक्ट्रिक बसगाड्यांचा समावेश हा तील स्वच्छ, हरित आणि आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.
हा उपक्रम राज्य शासनाच्या शाश्वत शहरी गतिशीलता वाढवून व कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे.







