सुरतहून शिर्डीकडे निघालेल्या साई भक्तांवर काळाचा घाला; चालकाचे नियंत्रण सुटलं, फॉर्च्युनरनं तीन पलट्या घेतल्या; तीन जणांचा मृत्यू, चार जखमी

सुरतहून शिर्डीकडे निघालेल्या साई भक्तांवर काळाचा घाला; चालकाचे नियंत्रण सुटलं, फॉर्च्युनरनं तीन पलट्या घेतल्या; तीन जणांचा मृत्यू, चार जखमी
By : | Edited By: Vishal Deokar | Updated at : 29 Oct 2025 10:15 AM (IST)

Nashik Accident News :नाशिकच्या येवल्यातून (Yeola) अपघाताची (Accident News) मोठी बातमी समोर आली आहे. सुरतहून शिर्डीकडे (Surat to Shirdi) निघालेल्या साई भक्तांवर काळानं घाला घातला आहे. नाशिक ते (Chhatrapati Sambhajinagar) राज्य मार्गावर भीषण अपघात (Accident) घडला असून यात चालकाचे नियंत्रण सुटल्याने फॉर्च्युनर गाडीचा भीषण अपघात घडला आहे. यात गाडीने चक्क तीन पलट्या घेतल्या असून या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

येवला तालुक्यातील एरंडगाव - रायते शिवारात हि दुर्दैवी घटना घडली आहे. Nashik Accident News :चालकाचे नियंत्रण सुटलं, फॉर्च्युनरनं तीन पलट्या घेतल्या, अन्. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने गाडीने तीन पलट्या घेतल्याय. अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाल्याची माहिती आहे.

सध्या जखमींना येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मृतांमध्ये सुरत येथील साई भक्तांचा समावेश आहे. तर दुर्दैवी अपघाताची येवला तालुका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. साई भक्तांवर काळानं घाला घातला असून या अपघातात तीन साई भक्तांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

Hidden Cam Scandal:चेंजिंग रूममध्ये स्पाय कॅमेरा लावून अश्लील चित्रण, व्यवस्थापकाला अटक नवी तील (Navi Mumbai) तळोजा (Taloja) परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, जिथे एका फार्महाऊसच्या व्यवस्थापकाने महिलांच्या चेंजिंग रूममध्ये स्पाय कॅमेरा लावून त्यांचे चित्रण केले. फार्महाऊसच्या व्यवस्थापकाने बाथरूममध्ये स्पाय कॅमेरा बसवून 'पाहुण्यांचे कपडे बदलतानाचे किंवा इतर खासगी क्षणांचे अश्लील व्हिडिओ चित्रण केले होते,' अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर तळोजा पोलिसांनी (Taloja Police) तातडीने कारवाई करत आरोपी व्यवस्थापकाला अटक केली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून स्पाय कॅमेरा आणि इतर साहित्य जप्त केले आहे. या गंभीर गुन्ह्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला 30 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निकम करत आहेत.

या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ही बातमी वाचा:.

📚 Related News