Parbhani News : नांदेडमध्ये (Nanded) शासकीय अधिकाऱ्यांची गाडी फोडल्याची घटना ताजी असतानाच आज परभणीतही (Farmers) जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातच हा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे. यानंतर शेतकऱ्याने सरकार विरोधात संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातबारा कोरा करतो म्हणाले होते, तसेच 18 हजार 500 हेक्टरी देतो म्हणाले, काय मिळाल आम्हाला? असा सवाल शेतकऱ्याने उपस्थित केला आहे.
मला गोळ्या घाला मी घाबरणार नाही असा इशारा या शेतकऱ्याने दिला आहे. संतोष पैके असं या गाडी फोडणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. आम्ही भाजपला मतदान केले मात्र तरीसुद्धा असे हाल यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो असं जाहीर केलं होतं, आत्ताही नुकसान होऊन शेतकऱ्यांना 18 हजार पाचशे रुपये मदत देतो म्हणून सांगितलं होतं. मात्र, ना कर्जमाफी झाली ना शेतकऱ्यांना दिवाळी झाली. तरी पैसे मिळाले नाहीत.
त्यामुळे आम्ही करायचं काय? आमचं चुकलं काय? आम्ही भाजपला मतदान केले मात्र तरीसुद्धा असे हाल होत असतील तर मग आमचा उद्वेग का होणार नाही? असा सवाल करत परभणीत जिल्हाधिकाऱ्यांची गाडी फोडणाऱ्या शेतकऱ्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला आहे. संतोष पैके असे या शेतकऱ्याचे नाव असून ते परभणीच्या पालम तालुक्यातील चाटोरी येथील आहेत. त्यांना सध्या नवा मोंढा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नांदेडनंतर परभणीतही शासकीय अधिकाऱ्यांची गाडी फोडल्याची घटना नांदेडनंतर परभणीतही शासकीय अधिकाऱ्यांची गाडी फोडल्याची घटना घडली आहे. संजयसिंह चव्हाण हे परभणीचे जिल्हाधिकारी आहेत.
शेतकऱ्याने त्यांची गाडी फोडली आहे. काल येथील तहसीलदारांच्या गाडीच्या तोडफोडीनंतर आज परभणीतही जिल्हाधिकारी यांची गाडी फोडण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लावण्यात आलेली जिल्हाधिकाऱ्यांची गाडी एका शेतकऱ्याने दगड टाकून फोडली. हा शेतकरी नेमका कोण आहे? हे अद्याप समजले नसले तरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वातावरण मात्र तणावाचे निर्माण झाले आहे. दरम्यान पोलिसांनी या शेतकऱ्याला ताब्यात घेतले असून त्याची माहिती घेण्याचे काम चालू आहे.
दरम्यान, राज्यातील अनेक शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि महापुरानंतर सरकारनं जाहीर केलेली मदत मिळालेली नाही. त्यामुळं शेतकरी आक्रमक होत आहेत.







