Actress Lives In 100 Year Old Bungalow:फिल्म प्रोड्यूसर फराह खानचा (Farah Khan) व्हीव्लॉग सध्या भलताच चर्चेत आहे. अलिकडेच फराह खाननं तिच्या व्हीलॉगमध्ये बॉलिवूड अभिनेत्री डायना पेंटीच्या (Actress Diana Penty) 100 वर्ष जुन्या मुंबईतील (Mumbai News) घराला भेट दिली आणि तिला आश्चर्याचा धक्का बसला. फराह खान थक्क झाली, इतकी की, फराह खान डायनाच्या जुन्या घराची तुलना शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) मन्नतसोबत करताना जराशीही अडखळली नाही. फराहचं हे वाक्य ऐकून डायना आपलं हसू अजिबात आवरू शकली नाही. व्हीलॉगच्या नव्या भागात फराह खानसोबत तिचा स्वयंपाकी दिलीपही तिच्यासोबत होता.
फराह खाननं डायनाच्या घराची झलकही प्रेक्षकांना दाखवली आणि त्यासोबत तब्बल 100 वर्ष जुन्या असलेल्या या घराबाबतच्या काही ऐतिहासिक गोष्टीही सांगितल्या. फराह खान संपूर्ण घर थक्क होऊन पाहत होती. ती म्हणाली की, "प्लीज मला तुझं घर दाखव. हे कोणतं ठिकाण आहे? मला असं वाटतंय की, मी काळाच्या मागे जाऊन कोणत्यातरी वेगळ्याच काळातील घरात पोहोचले आहे. " काचेची नक्षी असलेलं लाकडाचं टेबल पाहून तिनं उत्साहानं विचारलं की, "हे किती जुनं आहे?" डायनाच्या आईनं उत्तर दिलं, "100 वर्षांहून अधिक जुनं आहे.
" डायनाचं 100 वर्ष जुनं घर पाहून फराह खान थक्क (Diana Penty Lives In 100 Year Old Bungalow) यावर प्रतिक्रिया देताना फराह म्हणाली की, "हे 100 वर्षांहून अधिक जुनं आहे. म्हणजे, माझ्यापेक्षाही जुनं! मी अशा जागेवर येऊन खूप खूश आहे, जिथे गोष्टी माझ्यापेक्षाही जुन्या आहेत. अशा ठिकाणी असल्याचा मला खूप आनंद आहे. " जेव्हा फराह स्वयंपाकघरात पोहोचली, तेव्हा तिला तिचा आनंद लपवताच आला नाही. ती म्हणाली, "वाह! हे स्वयंपाकघर पाहा, ते अद्भुत आहे!" तिच्या स्वयंपाकी दिलीपकडे वळून तिनं विचारलं, "तू कधी इतकं सुंदर घर पाहिलंय का?" दिलीप हसला आणि म्हणाला, "नाही, मॅडम, कधीच नाही.
" यावर डायना म्हणाली, "माझं बाहेर एक शेत आहे. " ज्यावर फराह म्हणाली की, "किती सुंदर! मला असं वाटतं की, मी वेगळ्या ठिकाणी आली आहे. हे सारखे अजिबात वाटत नाही. " त्यानंतर फराहनं विचारलं की, ती या घरात कधीपासून राहतेय. डायना म्हणाली, "अगदी 100 वर्षांपूर्वी, माझ्या पणजोबांच्या काळापासून.
मी या घरात राहणारी चौथी पिढी आहे. " फरह खानकडून डायनाच्या घराची शाहरुखच्या मन्नतसोबत तुलना (Farah Khan Compares With Shahrukh Khan Mannat) फराह खान डायना पेंटीचं घर पाहून खूप प्रभावित झाली. एका जागेबद्दल बोलताना फराह म्हणाली, "लोखंडवाला इथला डान्स स्टुडिओही इतका मोठा नाही! तो शाहरुख खानच्या मन्नत लिविंग रूमइतका मोठा आहे. " घर पाहून फराह खान करत असलेलं कौतुक आणि तिचे शब्द ऐकून डायना पेंटी स्तब्ध झाली आणि तिनं असहमती दर्शवली, पण फराह खान पुन्हा पुन्हा तेच म्हणत होती. फराह म्हणाली, "शाहरुख खानला इथे आमंत्रित करायला हवं.
" डायना हसली आणि म्हणाली, "मला इथे शाहरुखला पहायला आवडेल. " डायनाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, डायना पेंटीनं कॉकटेलमधून बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण केलं, ज्यामध्ये सैफ अली खान आणि दीपिका पदुकोण देखील होते. त्यानंतर तिनं हॅपी भाग जायेगी, परमाणु:द स्टोरी ऑफ पोखरण, हॅपी फिर भाग जायेगी आणि सॅल्यूट सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. ती अलीकडेच डिटेक्टिव्ह शेरदिलमध्ये दिसली, ज्यामध्ये दिलजीत दोसांझ, बोमन इराणी, चंकी पांडे आणि बनिता संधू देखील आहेत. डायना शेवटची अमेझॉन प्राइम व्हिडिओ शो 'डू यू वॉना पार्टनर'मध्ये दिसलेली, ज्यामध्ये तमन्ना भाटिया आणि नीरज काबी देखील होते.
या सीरिजचा प्रीमियर 12 सप्टेंबर रोजी प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झालेला. महत्त्वाच्या इतर बातम्या :.








