Beed News : जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पांगरी गावात मागणीसाठी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रवीण बाबुराव जाधव असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात आरक्षण मिळावे, या मागणीसाठी प्रवीण जाधव काही काळापासून सक्रिय होता. बंजारा समाजाच्या आरक्षणाबाबत शासनाने कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याने उचललं टोकाचटं पाऊल बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात आरक्षण मिळावं, अशी मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे.
मात्र, या मागणीवर शासनाने कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याने तो मानसिक तणावात होता, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. अखेर आज त्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले. आत्महत्या करण्यापूर्वी प्रवीणने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. त्या व्हिडिओत त्याने आपल्या आत्महत्येला सरकार जबाबदार असल्याचे म्हटले आहे. घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि प्रवीणचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला आहे.
दरम्यान, एसटी प्रवर्गामध्ये बंजारा समाजाला आरक्षण मिळावं, याकरिता आतापर्यंत स्थापन केलेले आयोग ही सकारात्मक होते. राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आरक्षण देण्याबाबत सकारात्मक भूमिका दाखवली होती. त्यानुसार आता बंजारा समाज ही मागणी करू लागला आहे. हैदराबाद गॅझेटियरचा आधार घेत बंजारा (Banjara) समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी राज्यात एकीकडे मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे पुरावे असलेल्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
त्यामुळे, ह्याच हैदराबाद गॅझेटियरचा आधार घेत बंजारा (Banjara) समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी बंजारा समाजाकडून होत आहे. तर दुसरीकडे या मागणीला आता आदिवासी समाजाकडून देखील कडाडून विरोध होत असल्याचे चित्र आहे. आदिवासींमध्ये काही केल्या घुसखोरी होऊ देणार नाही, अन्यथा सरकार विरोधात आम्हालाही रस्त्यावर उतरावे लागेल असा अशारा आदिवासी समाजाकडून देखील देण्यात आला आहे. सध्या ात बंजारा समाजाला विमुक्त जाती (अ) (VJ-A) प्रवर्गाचे आरक्षण आहे. तर वंजारी समाजाला विमुक्त भटक्या जमाती (NT-D) या प्रवर्गाचे आरक्षण आहे.
बंजारा समाजाला तेलंगणा आणि राजस्थानमध्ये एसटी (अनुसूचित जमाती) प्रवर्गाचे आरक्षण आहे. आम्हीसुद्धा तिकडे एसटी प्रवर्गातच आहोत. बंजारा आणि वंजारा (vanjari community) वेगवेगळे आहेत का? असास सवाल देखील उपस्थित केला जात आहे.






