Nagpur Crime News: नागपूरमध्ये एका व्यापाऱ्याला दरोडेखोरांनी लुटल्याची घटना समोर आली आहे. यावेळी हल्लेखोरांनी गोळीबार केला आणि 50 लाख रुपये लुटले. या घटनेत व्यापारी जखमी झाला आहे. या घटनेमुळे मध्ये (Nagpur News) एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कडबी चौकात एका व्यापाऱ्यावर भररस्त्यात अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार (Gun Firing) केला व त्याच्याजवळील जवळपास 50 लाखांची रक्कम लुटून (Nagpur robbery) पळ काढला. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या गोळीबारात व्यापारी जखमी झाला आहे. संबंधित रक्कम हवालाशी निगडीत असल्याचा पोलिसांना संशय आहे.
राजू दिपानी (जरीपटका) असे जखमी व्यापाऱ्याचे नाव आहे. ते व्यापारी असून गुजरातमधील एका कंपनीसाठीदेखील डेटा फिडिंगचे काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचे 10 नंबर पुलाजवळ कार्यालय आहे.
रात्री आठ वाजताच्या सुमारास ते कार्यालयातून निघाले व चौकातून आतील भागात शिरले. तेथे बाबा नावाच्या व्यक्तीच्या घरासमोरून ते दुचाकीने जात असताना मोटारसायकलवरून दोन आरोपी आले व त्यांनी दिपानी यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या हातात स्प्रे पाहून दिपानी यांनी धोका ओळखून तेथून निघण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी त्यांच्यावर पिस्तुलाने तीन गोळ्या झाडल्या. पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.
Mumbai Cable Robbery: मुंबईत चक्रावणारी चोरी, एमटीएनएल कंपनीची एक कोटीची केबल चोरली
मुंबईच्या जोगेश्वरीत MTNL कंपनीच्या एक कोटी रुपयांची केबल चोरीचा पर्दाफाश झाला आहे. आंबोली पोलिसांनी ही कारवाई करत टोळीतील काहीजणांना पकडले. जोगेश्वरी पश्चिम येथील अहमद उमरभॉय मेमन कॉलनी, फ़ारूक हायस्कूल फॉर गर्ल्स आणि फ़ारूक कॉलेज समोरील एस.व्ही. रोड परिसरातून तब्बल 1 कोटी रुपयांची MTNL ची केबल चोरी केली जात होती. त्यावेळी आंबोली पोलीस आणि MTNL अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करून या प्रकरणात एक JCB, दोन लॉरी आणि ७८६ क्रमांकाची इनोव्हा (राजकीय व्यक्तीची गाडी) जप्त केली आहे. या कारवाईत एक राजकीय व्यक्तीसह एकूण 10 जणांना अटक करण्यात आली असून तब्बल 25 आरोपी फरार झाले आहेत. चोरीला गेलेली जवळपास 1 कोटी रुपयांची केबल घटनास्थळावरूनच पोलिसांनी हस्तगत केली आहे.
आणखी वाचा