Major Naxal Development: नक्षलवाद्यांचा नेतृत्व आता तेलंगणामधील करीमनगर जिल्ह्यातील देवजी उर्फ संजीव उर्फ पल्लव करणार आहे.. नंबाला केशव उर्फ बसवराजु च्या एन्काऊंटर नंतर नक्षलवाद्यांचा सर्वोच्च "सरचिटणीस" (जनरल सेक्रेटरी) पद रिक्त होतं.. नक्षलवाद्यांच्या कोअर टीमने सरचिटणीस देवजीची नेमणूक केल्याची माहिती आहे.. तर पोलिसांविरोधातल्या लढ्यात अत्यंत महत्त्वाच्या "दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी" म्हणजे छत्तीसगडचे सात आणि महाराष्ट्रातील अशा आठ जिल्ह्यातील सशस्त्र ऑपरेशनची जबाबदारी छत्तीसगड मधील भूमिपुत्र हिडमा कडे सोपवण्यात आली आहे...
विशेष म्हणजे नक्षलवाद्यांकडून यासंदर्भात कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.. एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगडमध्ये नुकतंच एका नक्षल कमांडरने आत्मसमर्पण केले असून त्याच्या चौकशीत सुरक्षा दल आणि छत्तीसगड पोलिसांना सरचिटणीसपदी देवजी तर दंडकारणणे स्पेशल झोनल कमिटीच्या सचिव पदी हिडमा याची निवड झाल्याची माहिती मिळाली आहे...
कोण आहे देवजी?
* तिप्पिरी तिरुपती उर्फ देवजी उर्फ संजीव हा 62 वर्षांचा असून गेले साडे तीन दशक नक्षलवादाशी जोडलेला आहे...
* तेलंगणा मधील कोरुटला, जिल्हा करीमनगर येथील दलित कुटुंबातील देवजी अत्यंत जहाल नक्षलवादी कमांडर राहिला आहे...
* देवजी नक्षलवाद्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या सेंट्रल कमिटी तसेच पॉलिट ब्युरोचा सदस्य ही राहिला आहे..
* देवजीवर विविध राज्याचे सहा कोटी रुपयांचा बक्षीस असून देवजी आतापर्यंत नक्षलवाद्यांच्या सेंट्रल मिल्ट्री कमांडचा प्रमुख होता..
* गुरिला पद्धतीने जंगलात सुरक्षा दलांवर त्यांच्यावर हल्ले घडवण्यात त्याला तरबेज मानले जाते.
* राणी बोदलीच्या घटनेत 55 तर दंतेवाडाच्या 80 सीआरपीएफ जवानांना देवजीच्या नेतृत्वात झालेल्या हल्ल्यात ठार करण्यात आले होते.
* श्रीलंकेतल्या एलटीटीई या संघटनेकडून नक्षलवाद्यांना भुसुरुंगस्फोटाच्या तंत्रासह गनिमी कावा पद्धतीच्या हल्ल्याचा तंत्र आत्मसात करण्यात देवजीची मोठी भूमिका आहे.
कोण आहे माडवी हिडमा?
* माडवी हिडमा अत्यंत क्रूर नक्षल कमांडर असून तो छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील पुवर्ती गावाचा स्थानिक भूमिपुत्र आहे
* त्याला देशाच्या नक्षल इतिहासातला एक क्रूर आणि धोकादायक नक्षल कमांडर मानले जाते..
* अनेक वर्ष नक्षलवाद्यांच्या सर्वात घातक मानल्या जाणाऱ्या बटालियन 1 चा नेतृत्व माडवी हिडमा ने केला आणि सुरक्षा दलाना सर्वाधिक नुकसान पोहोचवले..
* 6 एप्रिल 2010 रोजी ताडमेटला येथे देशातील सर्वात मोठ्या नक्षलवादी हल्ल्यात माडवी हिडमाच्या नेतृत्वात बटालियन 1 ने सीआरपीएफच्या 76 जवानांना मारले...
* 2013 मध्ये सुकमा मधील झिरम घाटीत काँग्रेस नेत्यांच्या ताफ्यावर माडवी हिडमाच्या नेतृत्वात हल्ला होऊन 31 काँग्रेस नेत्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला...
* 2017 मध्ये भेज्जी या ठिकाणी सीआरपीएफच्या 12 जवानांचा मृत्यूसाठी हिडमा व बटालियन 1 जबाबदार मानले जाते...
* 2017 मध्ये बुरकापाल या ठिकाणी 25 पोलिसांचा मृत्यूमागे हिडमाच्या बटालियन 1 चा हात होता..
* 4 एप्रिल 2021 रोजी टेकुलगुडा मध्ये हिडमाच्या नेतृत्वात नक्षलवाद्यांनी 23 सीआरपीएफ जवानांची हत्या केली...
* हिडमा किती धोकादायक नक्षल कमांडर आहे याचा अंदाज छत्तीसगड, तेलंगणा, झारखंड, ओडिशा आणि ात मिळून त्याच्यावर एकूण सहा कोटींचे बक्षीस आहेत..