Kantara Rishab Shetty: कांतारामधील 'तो' म्हातारा कोण होता ऐकलंत तर चाट पडाल, थक्क करणारा मेकओव्हर

Kantara Rishab Shetty: कांतारामधील 'तो' म्हातारा कोण होता ऐकलंत तर चाट पडाल, थक्क करणारा मेकओव्हर
By : | Updated at : 29 Oct 2025 10:45 AM (IST)

Kantara Chapter 1:कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टी (Rishab shetty) 'कांतारा:चॅप्टर १' या चित्रपटातून 'कांतारा' या चित्रपटापेक्षाही मोठी कमाई करताना आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसत आहेत. "कांतारा:चॅप्टर १" या महिन्यात दसऱ्याला प्रदर्शित झाला आणि आता तो २०२५ मधील सर्वात मोठा भारतीय चित्रपट बनला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जवळपास 26-27 दिवसांनी, एक मोठा आणि नवीन खुलासा समोर आला आहे ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे. (Rishab shetty) "कांतारा:चॅप्टर १" पाहिलेल्या चाहत्यांना ‘मायकारा’ एक म्हातारा जो सुरूवातीपासून लक्ष वेधतो, आणि शेवटीपर्यंत तो दैवी रूपाने मदत करतो, त्याबाबत एक मोठा खुलासा समोर आला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ही भूमिका ऋषभ शेट्टीनेच (Rishab shetty) साकारली होती.

आता चित्रपटाशी संबंधित एक BTS व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ऋषभ शेट्टी (Rishab shetty) या भूमिकेसाठी तयारी करताना दिसत आहे. mayakara role makeover transformation:‘मायकारा’ होण्यासाठी लागत होते तब्बल सहा तास ऋषभ शेट्टीने 'कांतारा:चॅप्टर १' साठी प्रत्येक ठिकाणी खूप मेहनत घेतली आहे. आता लोकांना कळले आहे की त्याने ‘मायकारा’ची भूमिका साकारली आहे, त्यामुळे सोशल मीडियावर ऋषभ शेट्टीचे (Rishab shetty) खूप कौतुक होत आहे. होम्बाले फिल्म्सने यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर एक बीटीएस व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ऋषभ शेट्टीचे ‘मायकारा’मध्ये रूपांतर होताना दिसत आहे. असे उघड झाले आहे की अभिनेत्याला मयकारामध्ये रूपांतरित होण्यासाठी सहा तास लागले.

मेकअप कलाकारांनी त्याचा मेकअप करण्यात तासनतास घालवले. (Rishab shetty) mayakara role makeover transformation:चाहतेही थक्क झाले हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांना समजले की ऋषभ (Rishab shetty) हाच मायकारा आहे. एका सोशल मिडीया युजरने कमेंट केली, "मी कल्पनाही करू शकत नाही की तो तूच आहेस. " एकाने लिहिले, "अप्रतिम. या परिवर्तनाने मी थक्क झालो आहे.

ऋषभ शेट्टी आणि त्याच्या अद्भुत टीमला सलाम. " दुसऱ्या एका युजरने लिहिले, "मला अजूनही माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. " इतके दिवस मला वाटायचे की मयकारा कोणीतरी दुसरी व्यक्ती आहे आणि ऋषभ फक्त तिचे डबिंग करत आहे. पण, ती व्यक्ती तोच आहे. कांतारा:चॅप्टर १ ची कमाई कांतारा: चॅप्टर १ ने भारतात दोन दिवसांत १०० कोटी रुपये कमावले.

चित्रपटाने २५ दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर ५९० कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाने जगभरात ₹८०९ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे, विकी कौशलच्या "छावा" ला मागे टाकत २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे.

📚 Related News