Satish Shah Passed Away: अभिनेता सतीश शाह यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूड आणि टेलिव्हिजनसृष्टी शोकसागरात बुडाली. २५ ऑक्टोबर रोजी सतीश शाह यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर 27ऑक्टोबर रोजी त प्रेअर मिट आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी त्यांच्या लोकप्रिय मालिकेतील सहकलाकार तसेच अनेक कलाकार उपस्थित होते. यावेळी अनेकांनी त्यांच्या आवडीची गाणी गट त्यांना भावनिक श्रद्धांजली वाहिली.
सोनू निगमचा भावनिक ट्रिब्यूट या प्रेअर मिटमध्ये गायक सोनू निगम यांनी सतीश शाह यांना श्रद्धांजली अर्पण करत एक हळवं गाणं गायलं ‘तेरे मेरे सपने अब एक रंग हैं’. त्यांच्यासोबत पत्नी मधु निगम यांनीही सूर जुळवले. गाण्यादरम्यान संपूर्ण वातावरण भावूक झालं. सतीश शाह यांच्या आयुष्याचा आणि कलाकार म्हून अनुभवलेल्या प्रवासाची सगळ्यांनाच आठवण झाली असावी. सोनू निगम यांनी सांगितलं की, “सतीशजींनी त्यांच्या आयुष्यभर लोकांना हसवलं, पण आज आम्ही त्यांच्या आठवणीने रडलो.
” रूपाली गांगुली आणि ‘साराभाई’ टीम भावूक सतीश शाह यांच्या लोकप्रिय शो ‘साराभाई वर्सेस साराभाई’ मधील सहकलाकार रूपाली गांगुली, सुमीत राघवन, रोशेश कुमार आणि देवेन भोजानी यांनी देखील त्यांना संगीताच्या माध्यमातून श्रद्धांजली दिली. रूपाली गांगुली डोळ्यांत अश्रू घेऊन मंचावर उभ्या होत्या. या सर्वांनी मिळून एक गाणं गात सतीश शाह यांच्या आठवणी ताज्या केल्या. त्यांच्या म्हणण्यानुसार, “आम्ही प्रत्येक वेळी जेव्हा एकत्र असायचो तेव्हा गाणं गात असायचो. त्यामुळे सतीशजींच्या स्मृतीतही आम्ही गाणं गायलं.
” जेवताना पहिला घास घेताच जमिनीवर कोसळले. सतीश शाह यांचे मॅनेजर रमेश कडातला यांनी सांगितले की, “25 ऑक्टोबर रोजी दुपारी ते लंच करत होते. एक बाईट घेतल्यानंतर अचानक ते खाली पडले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. ” काही महिन्यांपूर्वी सतीश शाह यांनी किडनी ट्रान्सप्लांट करून घेतलं होतं.
त्यांनी हे पाऊल आपल्या पत्नी मधु शाह यांच्या काळजीसाठी उचललं होतं, कारण त्या सध्या अल्झायमर या आजाराशी झुंज देत आहेत.







