Virat Kohli Restaurant One8 Menu:भारतीय क्रिकेट टीमची (Indian Cricket Team) रन मशीन आणि जगभरातील सर्वात प्रसिद्ध खेळाडूंमध्ये अव्वल असलेला खेळाडू म्हणजे, विराट कोहली (Virat Kohli). विराट जेवढा मैदानात हुशारीनं खेळतो, तेवढाच तो बिझनेसमध्येही स्मार्ट आहे. क्रिकेटनंतर जर विराट कशावर प्रेम करत असेल, तर ते जेवणावर, खाण्यावर. आजवरच्या अनेक मुलाखतींमध्ये त्यानं स्वतः हे बोलताना मान्य केलं आहे. आपली हीच आवड जपत विराट कोहलीनं एक रेस्टॉरंट सुरू केलं आहे.
ज्याचं नाव आहे, One8 Commune. विराट कोहलीच्या या खास वेंचरचे देशभरात 10 शानदार आऊटलेट्स आहेत. पण, मुंबईच्या जुहूतील आऊटलेट इतर आऊटलेपेक्षा वेगळं आहे. कारण, विराट कोहलीचं मुंबईतील हॉटेल बनलंय बॉलिवूडमधले दिग्गज सिंगर किशोर कुमार यांच्या बंगल्यात. विराटचं या जागेवर विशेष प्रेम आहे आणि त्यानं स्वतः लक्ष घालून किशोर कुमारांच्या घराचं हॉटेलमध्ये रुपांतर केलं आहे.
किशोर दांसोबत विराट कोहलीचं खास कनेक्शन 2022 मध्ये जेव्हा विराट कोहलीनं जुहूचं One8 Commune लॉन्च केलं, त्यावेळी त्यानं सांगितलेलं की, त्याचं किशोर दांसोबत एक इमोशनल कनेक्शन आहे. आपल्या रेस्टॉरंटच्या युट्यूब चॅनलवर विराट कोहली म्हणालेला की, "जर मला एखाद्या जग सोडून गेलेल्या व्यक्तीला भेटण्याची संधी मिळाली तर मी नेहमीच सांगीन की, मला किशोर दांना भेटायचंय. त्यांची पर्सनॅलिटी खूपच जादुई होती. आणि त्यांची गाणी थेट आपल्या काळजाला हात घालतात. " जुहूतलं आऊटलेट डिझाइन करताना विराट आणि त्याच्या टीमनं बंगल्याची आत्मा आणि होमली फील कायम राहील याची काळजी घेतली आहे.
विराटची जर्सी, ग्लास रूफ आणि 'सुपरफूड' मेन्यू One8 Commune हे वेंचर नेम विराट कोहलीच्या जर्सी नंबर 18 वरुन घेण्यात आलं आहे. हॉटेलमध्ये त्याची जर्सी भिंतीवर लावण्यात आली आहे. रेस्टोरेंटचं संपूर्ण छत काचेचं आहे. ज्यामुळे दिवसभर नॅच्युरल सनलाईट मिळते आणि वाईब एकदम पॉझिटिव्ह राहते. विराटचं म्हणणं आहे की, चांगल्या जागेत तेव्हाच यश मिळतं, जेव्हा तिथलं जेवण तितकंच शानदार असतं.
त्यामुळे त्याच्या मेन्यूमध्ये इंडियन, सीफूड, प्लांट बेस्ड आणि व्हेजिटेरियन ऑप्शन्स आहेत. विराट कोहलीच्या रेस्टॉरंट्सच्या मेन्यूच्या किमती व्हायरल विराट कोहलीच्या लग्झरी रेस्टॉरंटमध्ये खाण्याचा अनुभव जेवढा प्रीमियम आहे, दरही तेवढेच एक्सक्लुझिव्ह आहेत. स्टीम्ड राईस :318 रुपये फ्रेंच फ्राइज:348 रुपये तंदूरी रोटी:118 रुपये 'बेबी' नान:118 रुपये दिल्लीपासून जयपूरपर्यंत पसरलंय विराटचं 'फूड एम्पायर' विराट कोहलीचं पहिलं One8 Commune दिल्लीच्या एरोसिटीमध्ये सुरू झालेलं. यानंतर पंजाबी बाग, गुरुग्राम, लोअर परेल (), बंगळुरू, कोलकाता, , इंदौर आणि जयपूरमध्येही याचे आऊटलेट्स उघडण्यात आले. बंगळुरूचं आऊटलेटही खास आहे कारण, ते एम.
चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाजूलाच आहे. महत्त्वाच्या इतर बातम्या :.








