Bacchu Kadu Farmer Protest : शेतकऱ्यांसाठी बच्चू कडूंचा महाएल्गार; सरकारला 12 वाजेपर्यंत अल्टीमेटम, महामार्गानंतर आता रेल्वे रोकोचा इशारा

Bacchu Kadu Farmer Protest : शेतकऱ्यांसाठी बच्चू कडूंचा महाएल्गार; सरकारला 12 वाजेपर्यंत अल्टीमेटम, महामार्गानंतर आता रेल्वे रोकोचा इशारा
By : | Edited By: Vishal Deokar | Updated at : 29 Oct 2025 08:06 AM (IST)

Bacchu Kadu :आमची चर्चेची तयारी आहे. चर्चेचे दार आम्ही बंद केलेले नाही, ते सरकारने बंद केले आहेत. आज दुपारी 12 वाजेपर्यंत आम्ही वाट पाहू त्यानंतर रेल्वे रोखून दाखवू, असा आक्रमक पवित्रा आता प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी घेत सरकारला अल्टीमेटम दिलं आहे. नागपूरमध्ये (Nagpur) बच्चू कडू (Bacchu Kadu), राजू शेट्टी (Raju Shetti) आणि महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी (Bacchu Kadu Farmer Protest) भव्य मोर्चा काढलाय. अद्याप बच्चू कडू यांचे आंदोलन सुरूच असून अजूनही प्रहारच्या कार्यकर्त्यांनी चार मुख्य महामार्ग रोखून धरला आहे.

दरम्यान, आज 12 वाजेपर्यंतचे अल्टिमेटम बच्चू कडू यांनी दिले आहे. त्यानंतर रेल्वे रोकोचा इशारा दिला आहे. कालची (28) रात्र बच्चू कडू आणि आंदोलकांनी जामठा येथे महामार्गावरच काढली आहे. त्यामुळे येत्या 12 वाजेपर्यंत सरकार नेमकं काय भूमिका घेतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. Bacchu Kadu:.

तर शेतकऱ्यांच्या आयुष्याची कोंडी झाली आहे, त्याचं काय? बच्चू कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कालची रात्र जामठा स्टेडियम जवळ महामार्गावरच झोपून काढली आहे. अजूनही बच्चू कडू यांच्यासोबत शेकडो आंदोलन महामार्गावर बसून आहेत. त्यामुळे नागपूर वर्धा महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे. शिवाय जामठा येथून जाणाऱ्या जबलपूर हैदराबाद महामार्गावर ही आंदोलन बसल्याने काही अंशी त्या ठिकाणची वाहतूकही ठप्प झाली आहे. लोकांची कोंडी होत असली तरी शेतकऱ्यांच्या आयुष्याची कोंडी झाली आहे, त्याचं काय? असा सवालही बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे.

चर्चेसाठी कृषिमंत्री महसूल मंत्री किंवा मुख्यमंत्री कोणी यावं अशी आमची अपेक्षा नाही. मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावे कर्जमाफी मिळावी ही अपेक्षा असल्याचे बच्चू कडू म्हणाले. Bacchu Kadu Farmer Protest :आंदोलकांनी 4 महामार्ग रोखून धरले, वाहनांच्या लांबच लांब रांगा - आणि जबलपूर - हैदराबाद महामार्ग बच्चू कडू यांच्या सोबत दाखल झालेल्या आंदोलकांनी रोखून धरल्याने दोन्ही रस्त्यांवर दोन्ही बाजूला अनेक किमीपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे खाजगी वाहनांनी किंवा st बसेस ने प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांची मोठी अडचण झाली आहे. तसेच धान्य, दूध, भाजीपाला, व इतर अत्यावश्यक वस्तू घेऊन जाणारे अनेक ट्रक्स ही महामार्गांवर थांबून आहे.

या आंदोलनाचा सर्वाधिक फटका सामान्य नागरिकांना बसत असून प्रवाशांचे हाल होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सरकारने यावर लवकर तोडगा काढावा अशी भावना व्यक्त केली जात आहे. अनेक किलोमीटरपर्यंत ट्रॅफिक जाम, सामान्य नागरिकही अडकून पडले बच्चू कडू आणि त्यांच्या आंदोलकांमुळे फक्त नागपूर - वर्धा महामार्गावरच कोंडी झालेली नाही, तर एका बाजूला नागपूर- आणि दुसऱ्या बाजूला नागपूर - रायपूरला दरम्यानचे जे दोन समांतर महामार्ग आहे, त्यांना जोडणाऱ्या आऊटर रिंग रोडवर ही आंदोलन सुरू झाले आहे. त्यामुळे आऊटर रिंग रोडवर ही कित्येक किलोमीटरपर्यंत ट्रक आणि अत्यावश्यक वस्तू घेऊन जाणाऱ्या वाहनांची कोंडी झाली आहे. विविध उद्योगांमध्ये कच्चा माल घेऊन जाणार ट्रक, बाजारपेठांमध्ये भाजीपाला घेऊन जाणारे वाहन आणि नागपुरात काही कामानिमित्ताने खाजगी वाहनातून आलेले सामान्य नागरिक सर्वच आऊटर रिंग रोडवर अनेक किलोमीटरच्या ट्रॅफिक जाममध्ये अडकून पडले आहे.

काल संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास आउटर रिंग रोडवरची वाहतूक आंदोलकांनी थांबवली होती, तेव्हापासून कित्येक तास जेवण पाणी शिवाय सामान्य नागरिक आणि ट्रकचालक अडकून पडले आहे. ज्यांच्या मोबाईलला रेंज आहे ते आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधू शकत आहे. अन्यथा अनेकांचे स्वकीयांशी संपर्क सुद्धा होत नाही आहे. ही बातमी वाचा:.

📚 Related News