Quick Summary
This article highlights: आयुष्मान रश्मिकाच्या ‘थामा’ चित्रपटाचं बॉक्स ऑफिसवर तुफान ओपनिंग! पहिल्याच दिवशी किती कोटींचा टप्पा ओलांडला?. In context: Thama First Day Box Office Collection: आयुष्मान खुराना (Ayushman Khurana) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘थामा’ दिवाळीच्या मुहूर्तावर 21 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला हॉरर-कॉमेडी या शैलीतील हा चित्रपट प्रेक्षकांच्या प्रचंड उत्साहात थेट थिएटरमध्ये दाखल झाला असून, पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका केला आहे. Stay tuned with The Headline World for more insights and details.
Thama First Day Box Office Collection: आयुष्मान खुराना (Ayushman Khurana) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘थामा’ दिवाळीच्या मुहूर्तावर 21 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. हॉरर-कॉमेडी या शैलीतील हा चित्रपट प्रेक्षकांच्या प्रचंड उत्साहात थेट थिएटरमध्ये दाखल झाला असून, पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका केला आहे.
मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘थामा’ चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी तब्बल 24 कोटी रुपयांची कमाई केली आहे, अशी माहिती सॅकनिल्कच्या अहवालातून समोर आली आहे. त्यामुळे या चित्रपटाने अनेक प्रतिस्पर्धी चित्रपटांना मागे टाकले आहे. आयुष्मान खुरानाने यात एका व्हँपायरची भूमिका साकारली असून, त्याच्या अभिनयाची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू आहे.
प्रेक्षकांमध्ये ‘थामा’ची क्रेझ
चित्रपट प्रदर्शित होताच सोशल मीडियावर ‘थामा’चा बोलबाला दिसून येत आहे. चित्रपटाचे कथानक, आयुष्मानचा अभिनय आणि रश्मिका मंदानाची स्क्रीन प्रेझेन्स या सर्व घटकांमुळे प्रेक्षकांची गर्दी वाढताना दिसते आहे. पहिल्या दिवसाच्या कलेक्शननंतर या चित्रपटाच्या विकेंड कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.आदित्य सरपोतदार यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या चित्रपटाला समीक्षकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. हॉररसोबत हलकीफुलकी कॉमेडी आणि अनपेक्षित ट्विस्ट प्रेक्षकांना थिएटरमध्ये खिळवून ठेवत आहेत. सोशल मीडियावरही चित्रपटाच्या मीम्स आणि रिव्ह्यूजचा पाऊस पडतोय.
प्रतिस्पर्धी चित्रपटाशी टक्कर
या दिवशीच हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा यांचा ‘एक दीवाने की दीवानियत’ हा रोमँटिक ड्रामा देखील प्रदर्शित झाला. परंतु आयुष्मानच्या ‘थामा’समोर त्याची चमक काहीशी फिकी पडल्याचे दिसून आले. ‘एक दीवाने की दीवानियत’ने पहिल्या दिवशी 8.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
पुढील काही दिवस ठरणार निर्णायक
पहिल्याच दिवशी मिळालेला हा प्रतिसाद पाहता, ‘थामा’चा विकेंड आणखी दमदार ठरण्याची शक्यता आहे. चित्रपटसृष्टीत पहिल्या दिवसाची कमाई हा चित्रपटाच्या यशाचा मापदंड मानला जातो, आणि त्या निकषावर ‘थामा’ने एक प्रभावी सुरुवात केली आहे.सध्याच्या घडीला आयुष्मानचा थामा वीकेंड कलेक्शनच्या शर्यतीत आणखी वेगाने धाव घेईल, अशी अपेक्षा केली जात आहे. दिवाळी सुट्टीचा फायदा मिळाल्यास या चित्रपटाचं कलेक्शन 50 कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
Content compiled and formatted by The Headline World editorial team.






