Yogita Chavan Saurabh Choughule: सध्या सिनेसृष्टीतल्या अनेक जोडप्यांच्या विभक्त झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. अनेक स्टार जोडप्यांनी तर थेट आपल्या घटस्फोटाच्या पोस्ट करत चाहत्यांना धक्का दिला आहे. इंडस्ट्रीत घटस्फोट (Divorce Trend) घेण्याचा ट्रेंड सुरू आहे, असं म्हटलं तरीसुद्धा वावगं ठरणार नाही. एकापाठोपाठ एक अशी जोडपी वेगळी होत आहे. सुखी संसाराच्या कित्येक वर्षांनी अनेकांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा आहेत.
अशातच मराठी सिनेसृष्टीतल्या (Marathi Industry) एका जोडप्याच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, लग्नाच्या वर्षभरातच हे स्टार कपल विभक्त झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. सिनेइंडस्ट्रीतील अनेक कपल्स वेगळ्या झाल्याच्या चर्चा आणि बातम्या समोर येत आहेत. अशातच आता मराठी कलाविश्वातील आणखी एक जोडपे विभक्त होणार असल्याची चर्चा रंगली आहे. हे जोडपं कुठेच एकत्र दिसत नाही.
तसेच, दोघांनीही एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केलं असून लग्नाचे फोटोही डिलिट केले आहेत. हे जोडपं म्हणजे, 'जीव माझा गुंतला' मालिकेतून घराघरात पोहचलेले योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले. 2024 मध्येच योगिता चव्हाण (Yogita Chavan) आणि सौरभ चौघुलेनं (Saurabh Choughule) आपली लग्नगाठ बांधलेली. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेले. दोघांची 'जीव माझा गुंतला' ही मालिका प्रचंड गाजलेली.
मालिकेत दोघांनी एकत्र स्क्रिन शेअर केलेली. आपलं लाडकं ऑन स्क्रिन जोडप्यानं, खऱ्या आयुष्यातही आयुष्यभरासाठी एकत्र आलेले पाहून चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. लग्नानंतर लगेचच योगिता चव्हाण बिग बॉसच्या घरात गेलेली. त्यावेळी चाहत्यांनी तिला मोठा पाठींबा दिलेला. मात्र आता लग्नाच्या वर्षभरातच दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरल्यामुळे चाहत्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
लग्नाचे फोटो डिलीट केले, एकमेकांना अनफॉलोही केलं. (Yogita Chavan Saurabh Choughule Divorce Rumors) गेल्या काही महिन्यांपासून योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांच्या एकत्र पोस्ट पाहायला मिळत नाहीत. तसेच, दोघांनी दिवाळीतही एकमेकांसोबतचे फोटो शेअर केले नाहीत. याव्यतिरिक्त त्यांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावरून डिलीट करण्यात आले आहेत. योगितानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दोघांचे फोटो डिलिट केल्याचं पाहायला मिळत आहे.
योगिताच्या अकाऊंटवर तिचे सौरभसोबतचे फोटो दिसत नाहीयेत. दोघांच्या नात्यात खरंत दुरावा आलाय की, तिनं आणखी दुसऱ्या कोणत्या कारणांमुळं हे फोटो डिलिट करण्याचा निर्णय घेतला, हे अद्याप समजू शकलेलं नाही. एवढंच काय तर, दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलोदेखील केलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दोघेही गेल्या काही महिन्यांपासून एकत्र राहत नाहीत. दोघांच्या विभक्त झाल्याच्या चर्चांनी जोर धरलेला असूनही, अद्याप दोघांनीही याबाबत काहीच वक्तव्य केलेलं नाही.
रिल लाईफ टू रियल लाईफ; योगिता-सौरभची हटके स्टोरी (Yogita Chavan Saurabh Choughule Love Story) गेल्याच वर्षी म्हणजे, 2024 मध्ये योगिता चव्हाण आणि सौरभनं लग्न केलेलं. दोघांनी लग्नाचे फोटो शेअर करुन चाहत्यांना सुखद धक्का दिलेला. दोघांनीही कलर्स मराठीवरच्या 'जीव माझा गुंतला' मालिकेत एकत्र काम केलेलं. मालिकेत योगिता आणि सौरभ मुख्य भूमिकेत झळकलेले. 'जीव माझा गुंतला' मालिकेत योगिता चव्हाणणं अंतरा, तर सौरभनं मल्हारचं पात्र साकारलं होतं.
याच मालिकेच्या सेटवर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. लग्नाचे फोटो शेअर करत त्यांनी '3 मार्च 2024… आयुष्यभराचा हमसफर' असं कॅप्शन दिलेलं.








